पुणे दिनांक २८ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरातील कमाल व किमान तापमानात चांगलीच घट होत असल्याने थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे.पुण्यात पहिल्यांदाच १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान थंडी रात्रीच्या बरोबर दिवसा देखील चांगलीच हुडहुडी आता जाणवत आहे.दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये पुण्यातील तापमानात घट होणार आहे. असा अंदाज हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी वर्तवला आहे.तसेच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचा अति उच्च काळ संपलेला आहे.त्यामुळे हिवाळ्याला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान थंडीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्या मुळे डिसेंबर.जानेवारी.व फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पर्यंत चांगली थंडी पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.