पुणे दिनांक २८ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सांगलीतून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलावरून भरघाव गाडी कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.दरम्यान कोल्हापूर वरुन सांगली कडे जाताना हा भीषण अपघात झाला असून या घटनेत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे.तर अन्य दोनजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.
दरम्यान या अपघातात दोन महिलांचा व एका पुरुषाचा मृतात समावेश आहे.दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघात मधील सर्वजण लग्न सोहळा आटपून कोल्हापूर वरुन सांगलीकडे येत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी थेट कृष्णा नदीच्या पुलावरून थेट पात्रात कोसळली आहे.दरम्यान अपघातातील मृत कुटुंब हे कोल्हापूर रोडवरील गंगाधर काॅलनी येथील रहिवासी आहेत.सदर अपघातानंतर सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.