पुणे दिनांक २८ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता पुण्यातून एक राजकीय वर्तुळातून अपडेट हाती आली असून. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान ते पुण्यातील पराभूत उमेदवारांसोबत संवाद साधणार आहेत.दरम्यान मुंबई वगळून इतर एकूण ८२ उमेदवारांसोबत राज ठाकरे यांची आज पुण्यात बैठक होणार आहे.सदरच्या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवा नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चिंतन करणार आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्रात एकूण १३९ विधानसभा मतदारसंघा मध्ये उमेदवार दिले होते.यातील एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत निवडून आलेला नाही. तसेच त्यांचा मागील विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांचा देखील पराभव झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे.