पुणे दिनांक २८ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत विनोद तावडे हे आघाडीवर असल्याची माहिती आहे.दरम्यान बिहार व उत्तरप्रदेश सारख्या राज्यांची जबाबदारी तावडे यांना भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने दिल्याने विनोद तावडे यांचे दिल्ली दरबारी वजन वाढले आहे.दरम्यान नवीन वर्षात फेब्रुवारी अखेरपर्यंत राष्ट्रीय अध्यक्षांची नेमणूक केली जाणार आहे.तर जानेवारीमध्ये भारतीय जनता पार्टी राज्याचे प्रदेशाध्यक्षांची नेमणूक करणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.त्यामुळे आता विनोद तावडे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.