Home Breaking News काॅग्रेसच्या आजच्या वर्किंग कमिटीच्या मिटींगमध्ये खरगे महाराष्ट्र काॅग्रेसवर नाराज

काॅग्रेसच्या आजच्या वर्किंग कमिटीच्या मिटींगमध्ये खरगे महाराष्ट्र काॅग्रेसवर नाराज

53
0

पुणे दिनांक २९ नोव्हेंबर ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.आज दिल्लीत काँग्रेस पक्षाची वर्किंग कमिटीची बैठक झाली आहे.दरम्यान सदरच्या बैठकी मध्ये महाराष्ट्र काॅग्रेसवर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चांगलेच नाराज झाले आहेत. महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या यात काॅग्रेस पक्षाच्या वतीने एकूण १०० जागा लढविल्या परंतु फक्त १६ जागांवर काॅग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. काॅग्रेस पक्षाच्या अनेक जेष्ठ नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.त्यामुळे  राज्यात विधानसभा निवडणुकीतील कामगिरीवर खरगेंनी नाराजी व्यक्त केली आहे.दरम्यान निवडणुकी मध्ये वातावरण अनुकूल असणे ही विजयाची खात्री नाही.वातावरणाचे निकालात रुपांतर करायला हवे होते.दरम्यान राज्यात पक्ष संघटनेने अपेक्षाप्रमाणे  काम न केल्याची त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान आज काॅग्रेसची वर्किंग कमिटीची बैठक झाली, यावेळी खरगे बोलत होते.

Previous articleअभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील सांताक्रूझ येथील निवासस्थानी ईडीची छापेमारी?
Next articleजेष्ठ नेते शरद पवार समाजसेवक बाबा आढाव यांच्या भेटीला, भेटी नंतर घेतली पत्रकार परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here