पुणे दिनांक २९ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागून सहा दिवस उलटून गेले आहे.महायुती ला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत असून देखील अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेले नाही , महायुतीत कधी मुख्यमंत्री पदावरुन खल सुरू होता.तो मिळताच आता पुन्हा एकदा गृहमंत्री पदावरुन शिवसेना एकनाथ शिंदे गट व भारतीय जनता पार्टीत तु तु मैं मैं सुरूच आहे. दरम्यान काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीचे तिन्ही नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे.या बैठकीत शिवसेना गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने अजित पवार यांनी अर्थमंत्री पदाबाबत दावा केला आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टीला व देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रीपद आपल्याकडेच ठेवायचे आहे.तर शिंदे गटाला काही करुन गृहमंत्रीपद पाहिजे.यावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी बैठकीत कोणताच निर्णय दिला नाही.त्यामुळे आज मुंबईत पुन्हा एकदा महायुतीच्या तिन्ही नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक होणार असून त्यातच आज निर्णय होण्याची शक्यता आहे.दरम्यान मुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीकडेच रहाणार आहे. तर आजच्या मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्रीपद व इतर मंत्रीपदा बाबत एकनाथ शिंदे.देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यात याबाबत चर्चा होणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या सुचना आणि निर्णयाबद्दल बैठकीत चर्चा केली जाणार आहे. दरम्यान येत्या काही दिवसांत राज्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊन लवकरच शपथविधी होऊ शकतो.अशी माहिती अधिकृत सूत्रांन द्वारे मिळत आहे.