पुणे दिनांक ३० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती दिल्ली वरुन एक खळबळ जनक अपडेट आली असून.दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.दिल्लीतील ग्रेटर कैलाश परीसरात केजरीवाल यांच्यावर एका पदयात्रा दरम्यान हल्ला झाला आहे.सदरच्या हल्ल्यात अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.ते पुर्णपणे सुरक्षित आहेत.दरम्यान हल्लेखोरा कडून कोणतातरी अंगावर पदार्थ फेकून हल्याचा प्रयत्न झाला आहे.त्यानंतर सुरक्षा रक्षकाने हल्लेखोरा ला लगेच ताब्यात घेतले आहे.
दरम्यान सदरच्या घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या विधानसभा निवडणूका आता अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत.यामुळे अरविंद केजरीवाल यांची पदयात्रा ही दिल्लीतील ग्रेटर कैलाश या भागात सुरू होती.याच दरम्यान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर कुठला तरी तरल पदार्थ अंगावर फेकून हल्ला करण्यात आला आहे. सदरच्या हल्ल्यानंतर आम आदमी पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्यात आला आहे.या हल्ल्यामागे भारतीय जनता पार्टीचा हात आहे.असे आम आदमी पार्टीच्या वतीने आरोप करण्यात आला आहे.