पुणे दिनांक ३० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबईतून राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ गटनेता निवडीसाठी ३ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली असून.सदरच्या बैठकीत गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. व त्यानंतरच ५ डिसेंबर रोजी नवीन सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन एक आठवडा उलटून गेला आहे. दरम्यान यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे तसेच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देखील गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे.फक्त भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी निवड अद्याप कोणत्याही नेत्याची झालेली नाही.दरम्यान महायुतीच्या वतीने मुख्यमंत्रीपदी साठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याच्या बोलले जात आहे.तर शिवसेना गृहमंत्री पदासाठी अडून बसल्याने भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्वापुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झालेला आहे.