पुणे दिनांक ३० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुण्यात आत्मक्लेश उपोषणस्थळी जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या भेटीला पोहोचले आहेत.त्यांनी यावेळी भेटी दरम्यान बाबा आढाव यांच्याशी संवाद साधला आहे.तसेच महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा व निवडणूकीत होत असलेला सरकारी 💸 पैशाचा वापर याच्या निषेधार्थ जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे वयाच्या ९५ व्या वर्षी आत्मक्लेश उपोषणला बसले आहेत.आज त्यांचा उपोषणचा तिसरा दिवस आहे.दरम्यान या उपोषणला जेष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे.दरम्यान या पूर्वी महायुतील नेते छगन भुजबळ यांनी देखील उपोषणस्थळी आढावांची भेट घेतली आहे.
दरम्यान आज दिनांक ३० नोव्हेंबर रोजी शनिवारी जेष्ठ नेते शरद पवार यांनी भेट घेतली आहे.त्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करण्यात आला आहे.सत्ता .पैशांद्वारे निवडणुक यंत्रणाच हातात घेतली.दरम्यान या विरोधात कोणीतरी पाऊस टाकावे हा जनतेचा सूर आहे.महात्मा फुलेंच्या वास्तूमध्ये बाबा आढाव लढा देत आहेत.दरम्यान जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी एकट्यांनी ही भुमिका घेणे पुरेसे नाही.एकप्रकारे जनतेचा उठाव यामध्ये राहिला पाहिजे.दरम्यान सत्ता धा-यांना जनतेचे काही पडले नाही.ईव्हीएम बाबत विरोधकांना लोकसभेत बोलू दिले जात नाही.असे जेष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.