पुणे दिनांक १ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक तेलंगणा मधून अपडेट आली असून.तेलंगणातील छत्तीसगढच्या सीमेवरील मुलुग जिल्ह्यातील एथुरुनगरम येथे ७ माओवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे.तेलंगणा माओवादी विरोधी पथकाच्या पोलिसांनी 👮 ही कामगिरी केली आहे.मृतांमध्ये माओवाद्यांचा प्रमुख नेता बद्रू याचा देखील समावेश आहे.दरम्यान पोलिस पथकाकडून माओवाद्यांचा शोध शोध घेण्यासाठी शोध मोहीम राबवली जात होती.त्याचवेळी चालपाका जवळील जंगल परिसरात पोलिस आणि माओवादी यांच्यात चकमक झाली.या चकमकीत एकूण ७ माओवाद्यांचा पोलिसांनी खात्मा केला आहे.दरम्यान पोलिसांना चकमकीच्या ठिकाणी घटनास्थळावरुन दोन एफे -४७ रायफल मिळाल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत.