पुणे दिनांक १ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती शिक्रापूर येथून खळबळ जनक अपडेट आली असून.दरम्यान पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर मध्ये माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.अज्ञात इसमांनी माजी सरपंच यांच्यावर दुपारी धारदार शस्त्राने वार करुन प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.दरम्यान या हल्ल्यात ते गंभीर रित्या जखमी झाले.व मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन उपसरपंचाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.सदरच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिस या प्रकरणी आरोपींचा शोध घेत आहेत.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर आज रविवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला धारदार शस्त्राने केला त्यांच्या मानेवर व पाठीवर गंभीर स्वरूपाचे वार करण्यात आले आहे.त्यांना उपचारासाठी तातडीने पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान त्यांच्यावर कोणत्या कारणामुळे हल्ला करण्यात आला यामागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.दरम्यान या हत्यामुळे शिक्रापूर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर घटनेची दखल घेत पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.व पोलिसांनी 👮 परिस्थिती आटोक्यात आली आहे.दरम्यान अज्ञात आरोपींच्या शोधा करीता पोलिस पथके रवाना करण्यात आले आहे.