Home Breaking News मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर करुन भाजपचा काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेना मेसेज?

मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर करुन भाजपचा काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेना मेसेज?

36
0

पुणे दिनांक १ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून ‌.गृहमंत्रीपदासाठी अडून बसलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर करुन भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकदम क्लिअर मेसेज दिल्याचे देखील बोलले जात आहे.  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा हा ५  डिसेंबर रोजी मुंबईत होईल.असे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.पण सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या‌ दरे या गावात आजारी असल्याने उपचार घेत आहेत.त्यामुळे गृहमंत्री पदासाठी अडून न बसता महायुतीच्या सरकार मध्ये सहभागी होण्याचा एक प्रकारे मेसेजच एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.आता भारतीय जनता पार्टीच्या या मेसेज नंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Previous articleकाळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दरे गावावरुन मुंबईला येण्याची शक्यता
Next articleराज्याच्या घटनाबाह्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षण कवच -खा.संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here