पुणे दिनांक १ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती मुंबईवरून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर पत्रकार परिषद मधून घणाघात केला आहे.घटनाबाह्या सरकारला सर्वोच्च न्यायालयांचे संरक्षण कवच आहे.दरम्यान २६ नोव्हेंबर रोजी सरकार स्थापन होणे गरजेचे होते.आमचे सरकार आले असते आणि उशीर झाला असता तर राष्ट्रपती राजवट लागू केली असती . तसेच सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला नाही आणि बावनकुळेंनी शपथविधीची तारीख जाहीर केली.बावनकुळे हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत का ? सध्या स्थितीत जी परिस्थिती आहे त्याला धनंजय चंद्रचूड हे जबाबदार आहेत.काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय नाही.असे देखील खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद मध्ये म्हणाले आहेत.