पुणे दिनांक २ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच दिल्लीवरून राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून. शिंदे शिवसेना गटाच्या खासदारांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला आहे.मंत्रीमंडाळात सहभागी होण्याची विनंती शिवसेनेच्या सर्व खासदार यांनी केली आहे.तसेच महत्त्वाची खाती इतर मंत्र्यांकडे न देण्याचे आवाहन देखील सर्व खासदारांनी केले आहे.दरम्यान दिल्लीत हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने शिवसेनेचे सर्व खासदार हे दिल्लीत उपस्थित आहेत.त्यामुळे सर्व खासदारांनी मिळून दिल्लीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून ही विनंती केली आहे.दरम्यान आता शिवसेना खासदारांच्या फोन नंतर शिंदे काय निर्णय घेतात हे पहावे लागेल.