पुणे दिनांक ३ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील न-हे येथे पेट्रोल चोरीच्या संशयातून एका युवकाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.सदरचा युवक हा मारहाणीत गंभीर रित्या जखमी झाला होता.त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.सदर घटने बद्दल युवकाचे वडील हे सिंहगड रोड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या न-हे पोलिस चौकीत फिर्याद देण्या साठी गेले असता यातील काही आरोपी हे राजकीय क्षेत्रातील असल्याने प्रथमदर्शनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली होती.नतंर पोलिसांनी फिर्याद दाखल करून यातील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे.तर यातील माजी उपसरपंच फरार झाला आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार समर्थ नेताजी भगत (वय २० रा.व्यंकटश्र्वेरा सोसायटी.अभिनव काॅलेजरोड न-हे पुणे) असे मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या बाबत त्याचे वडील नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. दरम्यान पोलिसांनी फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झाले ल्या लोकांची नावे १) गौरव संजय कुटे ( वय २४ ) २) अजिंक्य चंद्रकांत गांडले (वय २०) ३) राहुल सोमनाथ लोहार ( वय २३ सर्व रा.मानाजीनगर न-हे पुणे) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर यातील चौथा आरोपी माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हा फरार झाला आहे.पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान न-हे येथील मानाजीनगर भागात दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता माजी उपसरपंच सुशांत कुटे हे त्यांच्या कार्यालया समोर मयत समर्थ याच्या गाडीतील पेट्रोल संपले म्हणून या वेळी तो दुसऱ्या गाडीतून पेट्रोल काढत होता.यावेळी गौरव संजय कुटे व त्यांच्या मित्रांनी यावेळी समर्थला बेदम मारहाण लाथाबुक्क्यांनी केली.या मारहाणीत समर्थ हा गंभीर रित्या जखमी झाला.त्याला तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले होते.दरम्यान सोमवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी समर्थचे वडील न-हे पोलिस चौकीत फिर्याद देण्यासाठी गेले असता पोलिसांनी 👮 गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे.असा गंभीर आरोप मयत समर्थ याचे वडील नेताजी भगत यांनी न-हे पोलिस चौकीतील ठाणे अंमलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर केला आहे.यातील आरोपी हे राजकीय असल्याने त्यांची फिर्याद घेण्यात आली नाही.नंतर त्यांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर त्यांची फिर्याद घेण्यात आली आहे.असा गंभीर आरोप भगत यांनी न-हे पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांवर केला आहे.दरम्यान आता न-हे पोलिस चौकीतील ठाणे अंमलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर पोलिस आयुक्त अमितेशकुमार हे कारवाई करणार का ? असा प्रश्न न-हे येथील नागरिकांनी केला आहे.दरम्यान सिंहगड रोड पोलिस यांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे.पोलिसांनी यातील आरोपी यांचे मोबाईल फोन जप्त केले आहे.