Home Breaking News प्रशासन व पोलिसांच्या दबावानंतर मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय मागे

प्रशासन व पोलिसांच्या दबावानंतर मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय मागे

63
0

पुणे दिनांक ३ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सोलापूर जिल्ह्यातील अकलूज तालुक्यातील मारकडवाडी येथून एक अपडेट हाती आली असून.पोलिस व प्रशासनाच्या दबावानंतर  मारकडवाडीत बॅलेट पेपरवर होणारे मतदान थांबवण्यां चा निर्णय घेण्यात आला आहे.वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत जमावबंदी आदेशांचे उल्लंघन केल्यास गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.अशी एकप्रकारे धमकीच गावकऱ्यांना दिली आहे.दरम्यान सोलापूर जिल्हा प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीत मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान होऊ द्यायचे नाही.असा मोठा दबाव जिल्हा प्रशासन व पोलिसांवर असल्याने तसेच येथील ग्रामस्थांना कायदेशीर कारवाईची भिती दाखवल्याने अनेक ग्रामस्थ हे मतदानाला आले नाहीत.दरम्यान पोलिसांच्या वाढत्या दबावानंतर  गावकऱ्यांच्या चर्चेनंतर आम्ही बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. असे उत्तमराव जानकर यांनी म्हटले आहे.

Previous articleफेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज तीन राज्यांत शाळांना सुट्टी
Next articleभारतीय जनता पार्टीकडून एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here