पुणे दिनांक ३ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई येथून खळबळजनक अपडेट हाती आली आहे. तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई गावात आज मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्याने भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे.सदरच्या दुर्घटना मध्ये एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर अद्याप दोनजण हे ढिगा-या खाली गाडले गेले आहेत.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान सदरची घटनेची माहिती मिळताच तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टालिन यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे.तसेच या दुर्घटना मध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबातील वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.दरम्यान घटनास्थळी बचावकार्य सुरू असून भूस्खलनात गाडल्या गेलेल्या अन्य दोन जणांचा शोध सुरू आहे.दरम्यान फेंगल चक्रीवादळामुळे तिरुवन्नामलाईत मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे अन्नामलाईयार डोंगरावर भूस्खलन झाले होते.सदरच्या भूस्खलनमध्ये दोन घरे ढिगा-या खाली गाडली गेली आहे.