पुणे दिनांक ३ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट मुंबईतून आली असून.देवेंद्र फडणवीस यांनी थोड्याचवेळा पूर्वी वर्षा बंगल्यावर जाऊन काळजीवाहू मुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे. दरम्यान दोघांमध्ये जवळपास तीस मिनिटे चर्चा झाली आहे.दरम्यान फडणवीस यांच्या आधी गिरीश महाजन यांनी देखील वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या वतीने गृहमंत्री व रेव्हेन्यू खाते अशी दोन महत्त्वाचे खात्यांची मागणी भारतीय जनता पार्टीकडे केली आहे.दरम्यान एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या मध्ये जवळपास तीस मिनिटे चर्चा झाली आहे.दरम्यान दोघांमधील चर्चा ही गुलदस्त्यात असून याची माहिती माध्यमांना मिळाली नाही.दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.आता दोघांच्या भेटी नंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.दरम्यान एक आठवड्या नंतर आजच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.