Home Breaking News बुलेट अंगावर झेलून पण बॅलेट पेपरवर मतदानाला थोड्या वेळेतच सुरुवात,मारकडवाडीतील गावकरी ठाम...

बुलेट अंगावर झेलून पण बॅलेट पेपरवर मतदानाला थोड्या वेळेतच सुरुवात,मारकडवाडीतील गावकरी ठाम प्रशासनाच्या वतीने गावात संचारबंदी लागू

34
0

पुणे दिनांक ३ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सोलापूर जिल्ह्यातील अकलूज तालुक्यातील मारकडवाडी गावातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून. आज मंगळवारी सकाळी आठ वाजता मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी ८ ते ४ यावेळी मतदान होणार आहे.तर  ४ ते ५ वाजता मतमोजणी होणार आहे.दरम्यान भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे काही येथील ग्रामस्थांना पोलिसांनी 👮 नोटीस बजावल्या आहेत.तसेच गावात ५ डिसेंबर पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.

दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आज मारकडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान होणार आहे.दरम्यान ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याची नोटीस प्रशासनाच्या वतीने गावकऱ्यांना दिली आहे. तसेच गावातील प्रमुख एकूण २० पदाधिकारी यांना पोलिसांनी देखील नोटीस बजावण्यात आली आहे. तर चाचणी मतदान घेण्यावर गावकरी ठाम आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर हे मारकडवाडी गावात दाखल झाले आहेत.दरम्यान बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर गावकरी ठाम आहेत.दरम्यान बॅलेट साठी बुलेट झेलू असा पवित्रा आता गावकऱ्यांच्या वतीने घेण्यात आला आहे.दरम्यान ईव्हीएम मशिन विरोधात आज बॅलेट पेपरवर मतदान पार पडले तर हे देशातील पहिले गाव ठरणार आहे.दरम्यान गावातील लोकांनी एकत्र येत  त्यांच्या खर्चाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्धार घेतला आहे.यावर शासनला आक्षेप घेण्याचे कारण काय? असा सवाल आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.तसेच मारकडवाडी येथे कसल्याही परिस्थितीत मध्ये मतदान होणार.असे देखील ते म्हणाले आहेत.प्रशासनाने दबावात येऊन अंतरवाली सराटीप्रमाणे आमच्यावर लाठीहल्ला केला किंवा बंदुकीतून गोळ्या जरी झाडल्या तरी गावात मतदान घेणारच असे देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Previous articleराजधानी दिल्लीतून मुख्यमंत्री शिंदेना शिवसेना खासदारांचा फोन
Next articleमंत्रीपदाची राष्ट्रवादीकडून दहा नावे निश्चित? हसन मुश्रीफ व दिलिप वळसे पाटील यांचा पत्ता कट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here