पुणे दिनांक ३ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट दिल्ली येथून आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांची काल दिल्लीत राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी सोमवारी महत्त्वाची बैठक झाली आहे. दरम्यान या बैठकीत महायुती सरकारमध्ये पक्षाकडून कोणाला मंत्रीपद देण्यात येणार यावर चर्चा झाली आहे.यामध्ये प्रामुख्याने दहा जणांची नावे निश्चित करण्यात आली आहे.मंत्र्यांची नावे.अजित पवार. छगन भुजबळ.आदिती तटकरे.दत्ता भरणे.धनंजय मुंडे.अनिल पाटील.नरहारी झिरवळ.संजय बनसोडे. इंद्रनिल नाईक.आणि मकरंद पाटील.अशी नावे आहेत .यात हसन मुश्रीफ व दिलिप वळसे पाटील या दोघांची नावे वगळून नव्या चेह-याला संधी देण्यात आली आहे.