पुणे दिनांक ४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती मुंबईतून राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट आली असून.काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या सहा महिन्यां साठी मुख्यमंत्रीपदाची मागणी भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व व गृहमंत्री अमित शाहांकडे केल्याची माहिती आता नव्याने समोर आली आहे.दरम्यान २८ नोव्हेंबरपर्यंत त्यांनी ही मागणी शाहांकडे उचलून धरली होती.असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. पण तुम्हाला मुख्यमंत्री केले तर चुकीचा पायंडा पडेल, असे सांगून अमित शाहांनी सांगून शिंदे यांची मागणी फेटाळून लावल्याचे कळते.दरम्यान महायुतीच्या वतीने भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री निश्चित मानला जात असून याबाबत आज केंद्रीय नेतृत्वाकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.