पुणे दिनांक ४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक दिल्लीवरून राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून.अजित पवार हे अद्यापही दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सोमवारी रात्रीपासून अद्यापपर्यंत अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान काल मंगळवारी रात्री त्यांची भेट होईल अशी चर्चा होती.मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल चंदीगड दौऱ्यावर असल्यामुळे अजित पवार हे अजून देखील वेटींगवरच आहे.दरम्यान महायुती सरकारच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज शाहांची भेट न घेताच मुंबईत परतणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.