-
पुणे दिनांक ४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक चंद्रपूर येथून खळबळ जनक अपडेट आली असून.तेलंगणानंतर आता महाराष्ट्रात देखील आज बुधवारी सकाळी साडे सात वाजता गडचिरोलीच्या अनेक भागात आज सकाळीच भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.दरम्यान आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अहेर सिरोंचा तालुक्यात हे धक्के जाणवले आहेत.तसेच चंद्रपूर व यवतमाळ मध्ये देखील सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.या व्यतिरिक्त छत्तीसगडमध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.दरम्यान या भूकंपाचा केंद्रबिंदू हा तेलंगणात आहे.दरम्यान ५.० तीव्रतेचा भूकंप धोकादायक मानला जातो.