पुणे दिनांक ४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मुंबई रत्नागिरी.व रायगड.जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पुढच्या ४८ तासांमध्ये राहणार आहे.दरम्यान फेंगल चक्रीवादळाचा मोठा परिणाम कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर राहणार आहे.तसेच पुणे . कोल्हापूर.घाट परिसरात सातारा.सोलापूर.सांगली.लातूर.व धाराशिव जिल्ह्यात येत्या २४ तासांमध्ये अवकाळी पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान ☁️ ढगांच्या गडगडाटा सह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल.असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात थंडी कमी झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये कोरडे व ☁️ ढगाळ वातावरण रहाणार आहे.ही शेतकरीवर्गा साठी चिंतेची बाब आहे. राज्यात थंडीचा जोर ओसरला आहे.पूर्व मध्य अरबी सागरात वरच्या बाजूला कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे.हा एक फेंगलचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील ४८ तासांच्या आत होईल.असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे.८ ते १० डिसेंबर पर्यंत या चक्रीवादळाचा कमी अधिक परिणाम रहाणार आहे.त्यामुळे उष्णता कमी होईल व पाऊस जाईल व पुन्हा वातावरण गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे.दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा सायक्लोनिक सक्यु॑लेशनची स्थिती निर्माण झाली आहे.कमी दाबाचे क्षेत्र वाढते का पाहावं लागणार आहे.त्यांचे परिणाम देखील येत्या काळात दिसून येण्याची शक्यता आहे.दरम्यान महाराष्ट्रात ३ ते ६ डिग्री तापमान ब-याच भागांमध्ये दिवसा वाढल्याची नोंद करण्यात आली आहे.तर रात्री साधारण २० ते २२ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान या अवकाळी पावसाचा फटका कांदा नवीन लागवड करणा-या शेतकऱ्यांना व ऊस तोडणीला तसेच साखर उद्योग व गु-हाळ चालकांना बसणार आहे.त्यामुळे यांचा सर्वाधिक परिणाम हा पश्चिम महाराष्ट्रात बसू शकतो.असा एकंदरीत अंदाज आहे.