पुणे दिनांक ४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबईवरून राजकीय वर्तुळातून एक अपडेट आली असून.भारतीय जनता पार्टीची कोअर कमिटीची बैठक आता नुकतीच संपली आहे.त्यानंतर आता गटनेतेपदाची बैठक सुरू होणार आहे.यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये दाखल देखील झाले आहेत.तसेच भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपानी व निर्मला सितारमन देखील सेंट्रल हॉलमध्ये पोहोचले आहेत.आता कोअर कमिटीचे सदस्य देखील आता विधानसभेकडे रवाना झाले आहेत.दरम्यान संपूर्ण राज्याचे लक्ष या गटनेतेपदी कोणाची निवड होणार याकडे लागले आहेत.