पुणे दिनांक ५ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई मधून एक मोठी अपडेट हाती आली असून.आज सरकार स्थापन झाल्यानंतर दिनांक ७ डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.याबाबत विधिमंडळ सचिवालया कडून कर्मचाऱ्यांना या बाबत महत्त्वाच्या सुचना देखील देण्यात आल्या आहेत.दरम्यान विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.सदरचा कार्यक्रम दोन दिवस चालण्याची शक्यता आहे.त्यामुळे हे विशेष अधिवेशन दोन दिवस असण्याची शक्यता आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी झाला असून अन्य मंत्रीमंडळाचा शपथ विधी हा विशेष अधिवेशनात होण्याची देखील शक्यता आहे.दरम्यान हे विशेष अधिवेशन झाल्या नंतर हिवाळी अधिवेशन हे दोन आठवड्यानंतर नागपूर येथे होणार आहे.