पुणे दिनांक ५ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.दरम्यान आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे.या आजच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.तर राज्याच्या शिष्टाचार विभागाच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व जेष्ठ नेते शरद पवार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.दरम्यान आज च्या या शपथविधी सोहळ्याला ते हजार राहणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.