पुणे दिनांक ५ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट मुंबईवरून आली आहे. महायुतीला महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणावर बहुमत मिळाले आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेली आमदार संख्या मिळवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे तुम्ही विरोधी पक्षनेतेपद विरोधाकांना देणार का ? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला .त्यावर हा अधिकार अध्यक्षांचा आहे.विधान सभा अध्यक्ष निवडीनंतर ते जे निर्णय घेतील,तो आम्हाला मान्य असेल, आम्ही सकारात्मक आहोत , असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.