पुणे दिनांक ६ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच क्रिकेट क्षेत्रांतून एक अपडेट हाती आली असून.अंडर -१९ आशिया चषकातील सेमीफायनल सामान्यात भारताने आज श्रीलंकेचा पराभव केला आणि फायनल मध्ये धडक मारली आहे. दरम्यान पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेने १७४ धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते.भारताने हे आव्हान अवघ्या २१.४ ओव्हर मध्ये पार केले आहे. भारताकडून वैभव सुर्यवंशी सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली आहे.त्यांने एकूण ५ फटकार व ६ चौकार लगावले आहे.तर आयुष म्हात्रेने ३४ धावांची खेळी केली आहे.