पुणे दिनांक ६ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे.वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.आदिवासी समाजा साठी पिचड यांचे मोठे योगदान आहे. ऑक्टोबर मध्ये पिचड यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता.मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान आता त्यांच्या निधनानंतर पिचड यांचे कार्यकर्ते हे रुग्णालयात बाहेर जमायला सुरुवात झाली आहे.