पुणे दिनांक ७ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.आज शनिवार महाराष्ट्र विधान सभेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन सुरू होणार आहे.सदरच्या आजच्या अधिवेशनात २८८ नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.दरम्यान हे विशेष अधिवेशन दिनांक ९ डिसेंबर पर्यंत चालणार आहे.सदरच्या अधिवेशनात हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर हे सभागृहाचे कामकाज पहाणार आहोत.तसेच याच अधिवेशनात विधानसभेच्या मुख्य अध्यक्षाची निवड केली जाणार आहे.दरम्यान त्यानंतर हिवाळी अधिवेशन हे १६ डिसेंबर पासून नागपूर येथे सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.