पुणे दिनांक ८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातून खळबळजनक अपडेट आली असून.पुणे रेल्वे स्टेशन बाॅम्बच्या सहाय्याने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात फोन पोलिसांना आला.दरम्यान या घटने बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही धमकी देण्यात आली होती.दरम्यान सदरच्या धमकी नंतर पोलिसांनी 👮 तपासाची चक्रे तातडीने फिरवत पोलिसांनी एक ४० वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.सदर आरोपी हा पिंपरी चिंचवड भागात राहत असून त्यांने दारुच्या नशेत पुणे रेल्वे स्टेशन बाॅम्बच्या सहाय्याने उडविण्याची धमकी दिली होती. दरम्यान या प्रकरणी आता पोलिसांनी 👮 आता त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान यापूर्वी देखील अशा स्वरूपाचे धमक्याचे फोन करून खोट्या धमक्या देण्यात आल्या आहेत.