पुणे दिनांक ८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते व उपाध्यक्ष पदाची मागणी केली आहे.दरम्यान सदरची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानभवनातील दालनात बैठक झाली.यात महायुतीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही मागणी केली आहे.दरम्यान महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेले २९ जागांचे संख्याबळ नाही.यामुळे आता महायुती महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद व उपाध्यक्षपद देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.