पिंपरी -चिंचवड ९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पिंपरी चिंचवड येथून एक खळबळजनक अपडेट आली असून.पिंपरी चिंचवड येथील कुदळवाडीतील एका भंगाराच्या गोदामाला भिषण आग लागली आहे.दरम्यान या आगीचे काळे लोट खुपदुरवरुन दिसत आहेत.दरम्यान आगीची घटना पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाला कळताच घटनास्थळी आगीचे बंब दाखल झाले असून त्यांच्या वतीने या आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान भंगाराच्या गोदामाला अचानकपणे आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.सुदैवाने या आगीत कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.पण आगीत भंगाराचे गोदाम जळून नष्ट झाल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.