पुणे दिनांक ९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण झाले आहे.दरम्यान या अपहरण प्रकरणी सूत्रांकडून मिळाले ल्या माहिती नुसार टिळेकर यांचे मामा आज सोमवारी सकाळी हडपसर येथील सोलापूर रोडवरील ब्लु बेरी हाॅटेल समोर थांबले होते.त्यावेळी एका चारचाकी वाहनातून आलेल्या चार जणांनी त्यांचे अपहरण केले आहे.दरम्यान सदर अपहरण प्रकरणी हडपसर पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान वाघ यांचे अपहरण करून अपहरणकर्ते हे सोलापूरच्या दिशेने गेले आहेत.दरम्यान या अपहरण प्रकरणी हडपसर पोलिस अधिक तपास करीत आहेत.दरम्यान सतीश वाघ यांचे अपहरण कशा साठी करण्यात आले? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.