पुणे दिनांक १० डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच मुंबई येथून एक अपडेट हाती आली असून.कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातात एकूण ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.यातील आता मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.दरम्यान सदरची ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देवेंद्र फडणवीसांनी या मदतीची घोषणा केली आहे.तसेच मृतांना त्यांनी श्रध्दांजली वाहिली आहे.बेस्ट बसच्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी,ही ईश्वरचरणी प्रार्थना,असे x हॅंडलवर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.