पुणे दिनांक १० डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी मुंबईतील कुर्ल्यावरुन एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.मुंबईत कुर्ल्यात बेस्टच्या भरघाव वेगाने येणाऱ्या बसने एलबीएस रोडवर आज मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाच जणांना चिरडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.तर अन्य ३० ते ३५ जण गंभीर रित्या जखमी झाले असून.तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या अपघातानंतर पोलिसांनी बस चालका विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान कुर्ला बेस्ट बस अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यांची नावे १) विजय विष्णू गायकवाड (वय ७०) २) आफ्रीन अब्दुल सलिम शहा (१९) ३) अनम शेख (वय २०) ४) कणीस फातिमा गुलाम कादरी (वय५५) ५) शिवम कश्यप (वय १८) अशी मृतांची नावे आहेत.तर या अपघातात अन्य २६ जण हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे.दरम्यान सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार बेस्टची बस ३३२ ही बस कुर्ला वरुन अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडला आहे. अपघातावेळी बस मध्ये एकूण ६० प्रवासी हे सकाळी प्रवास करत होते.दरम्यान या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस कर्मचारी व एमएसएफचा जवान जखमी झाला आहे.पोलिसांनी बेस्ट बसचा चालक संजय मोरे (वय ५४ ) यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.अशी प्रथम दर्शनी माहिती मिळत आहे.