पुणे दिनांक १३ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक बीड जिल्ह्यातून अपडेट आली असून.सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याच्या निषेधार्थ आज शुक्रवारी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान सरपंच देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांच्या पोलिसांनी 👮 मुसक्या आवळल्या आहेत.तर यातील अन्य चार आरोपी हे अद्याप फरार आहेत. दरम्यान या हत्यातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज सर्वपक्षीय नेत्यांकडून बीड बंदची हाक देण्यात आली आहे.दरम्यान आज सकाळपासून बीड मधील सर्व दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत.त्यामुळे या बंद साठी नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे.