पुणे दिनांक १३ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती हैदराबाद येथून चित्रपट सृष्टीतील एक खळबळजनक अपडेट आली असून हैदराबाद मधील नामपल्ली न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावलेल्या अल्लू अर्जुनला आता दिलासा मिळाला आहे.दरम्यान तेलंगणातील उच्च न्यायालयाने अल्लुला अंतरिम जामीन मंजूर केला आहे.परंतू पोलिसांनी 👮 आधीच अल्लुला चंचलगुडा येथील कारागृहात हलवले आहे.दरम्यान पुष्पा -२ सिनेमाच्या प्रिमियरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता.यावेळी अल्लू अर्जुन हा प्रिमियर शो करिता आला होता.त्यामुळे त्याला त्याच्या राहत्या घरातून आज दुपारी तेलंगणा पोलिसांनी अटक केली होती.