पुणे दिनांक १४ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजधानी दिल्लीतून एक राजकीय वर्तुळातून अपडेट हाती आली असून.’वन नेशन वन इलेक्शन ‘ विधेयकावरून बरेच आरोप व प्रत्यारोप होत आहेत.दरम्यान आता कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोमवारी लोकसभेत हे विधेयक मांडणार आहेत.तसेच ‘वन नेशन वन इलेक्शन ‘ हे विधेयक चर्चेसाठी जेपीसीकडे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.त्यानंतर जेपीसी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करतील व या नंतर या विधेयकासाठी किती सहमती मिळत आहे.हे पाहूनच पुढील निर्णय घेण्यात येईल.अशी देखील माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान हे विधेयक चर्चेसाठी येण्यापूर्वीच अनेक राजकीय पक्षांनी या विधेयकाला प्रचंड प्रमाणावर विरोध सुरू केला आहे.