पुणे दिनांक १४ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच मुंबई वरुन एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट हाती आली असून. दरम्यान महाराष्ट्रात मंत्री मंडळाच्या विस्तारात कोणाच्या हाती कोणते खाते जाणार? याच्यावर महायुतीत मोठा खल सुरू आहे.दरम्यान आता याचा निर्णय उद्या रविवारी १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या मंत्रीमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार व शिवसेनाचे एकनाथ शिंदे या दोघांजणांना जोर का झटका बसण्याची शक्यता आहे.कारण गृहखाते व अर्थखाते हे दोन्ही पावरफुल दोन्ही खाते भारतीय जनता पार्टीकडेच जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान असे झाल्यास दोन्ही पावरफुल खात्यावर भारतीय जनता पार्टीचाच वरचष्मा राहिल .असे देखील बोलले जात आहे.दरम्यान यापूर्वी गृहमंत्री खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते.तर या खात्यावर शिवसेना शिंदे गट आग्रही आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्री खाते होते ते देखील या खात्यावर आग्रही आहेत.आता यावर उद्याच नागपूर येथे अंतिम निर्णय घेण्यात येईल.