पुणे दिनांक १५ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फुटी उंच पुतळा उभा राहणार आहे.या पुतळ्याचे काम शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीला देण्यात आले आहे.यासाठी राम सुतार यांच्या आर्ट क्रिएशन्स कंपनीला २०.९५ कोटी देण्यात आले आहेत.दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण करावे आणि १०० वर्षे पुतळा टिकेल असे बांधकाम असावे,अशी अट घालण्यात आली आहे.