पुणे दिनांक १६ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथून आता एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून. काल झालेल्या मंत्रिमंडळात कुणबी समाजाला तर त्याच्या खालोखाल मराठा समाजाला महायुतीच्या वतीने नवीन मंत्रीमंडळात स्थान दिले आहे.दरम्यान काल रविवारी नागपूर येथे महायुतीचा मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.यात पहिल्या टप्प्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात यात एकूण ३३ कॅबिनेट मंत्र्यांचा तर एकूण ६ राज्यमंत्र्यांचा शपथ विधी झाला आहे.आता एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नवीन मंत्रीमंडळात एकूण ४२ मंत्री महायुतीचे झाले आहेत. नवीन मंत्रीमंडळात फडणवीसांनी काही नवीन व जुन्या चेह-यांना संधी दिली आहे.या ४२ मंत्र्यांमध्ये १६ मराठा समाजाचे व १७ ओबीसी १ मुस्लिम तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह २ ब्राह्मण ३ कुणबी २ बंजारा आणि वंजारी समाजांचे एकूण ३ मंत्र्यांचा यात समावेश आहे तर लाडक्या बहिणींचा महायुतीला निवडणूकीत मोठ्या प्रमाणावर फायदा झाला म्हणून या मंत्रीमंडळात एकूण चार महिला मंत्र्यांचा देखील प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.