पुणे दिनांक १६ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.परभणी येथील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ सुर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडी मध्ये असताना मृत्यू झाला होता.दरम्यान या घटनेचा निषेध म्हणून आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.आज आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांकडून बीड जिल्हा तसेच परभणी शहरात आज धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.दरम्यान सोमनाथ सुर्यवंशी (वय३५ ) यांचा न्यायालयीन कोठडी असताना मृत्यू झाला म्हणून याचे पडसाद रविवारी परभणी व बीड तसेच नांदेड या जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता.