Home Breaking News छगन भुजबळ यांची उद्या पत्रकार परिषद, भुजबळ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे...

छगन भुजबळ यांची उद्या पत्रकार परिषद, भुजबळ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष

37
0

पुणे दिनांक १७ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.मंत्रीपद न मिळाल्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ हे चांगलेच नाराज झाले आहेत.त्यांच्या बरोबर समता परिषदेचे नेते व कार्यकर्ते हे देखील आक्रमक झाले आहेत.दरम्यान उद्या जेष्ठ नेते छगन भुजबळ हे दुपारी १२वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. दरम्यान जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्याच्या नाराजीचे सूर संपूर्ण राज्यभर उमटत आहेत.दरम्यान छगन भुजबळ यांनी आज नाशिक मध्ये आणि येवल्यात आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली.त्यानंतर आता उद्या ते आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट करणार आहेत त्या मुळे सर्वांचे लक्ष उद्याच्या पत्रकार परिषदेत भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात ?  व भुजबळ यांची समजूत काढण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळते का हे आता उद्याच चित्र स्पष्ट होईल

Previous articleराज्यपालांच्या चहापानाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दांडी, अजित पवार यांची तब्येत ठीक नाही ते नागपूरातच – सुनील तटकरे
Next articleमी तुमच्या हातातलं खेळणं आहे का? छगन भुजबळ अजितदादांची साथ सोडणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here