पुणे दिनांक १७ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथून एक राजकीय वर्तुळातून एक अपडेट आली असून.नागपूरमध्ये राज्यपालांनी आयोजित केलेल्या चहापाण्याच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली आहे.मागील दोन दिवसांपासून अजित पवार नाॅट रिचेबल असण्याची चर्चा आहे.दरम्यान चहापाण्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी आमदारांनी हजेरी लावली होती.दरम्यान मंत्रीमंडळ विस्तारानंतर देखील हिवाळी अधिवेशनाला देखील अजित पवार यांनी हजेरी लावली नाही.त्यामुळे चर्चाला उधाण आले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे की.अजित पवार यांना थ्रोट इन्फेक्शन झाल्याने ते अधिवेशनात सहभागी झाले नाहीत.ते कुठेही बाहेर गेले नसून ते नागपूर येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानीच आहे.व आराम करत आहेत.ते दिल्लीला गेलेल्या बातम्या निराधार आहेत.असे देखील प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.दरम्यान अजित पवार हे नागपूर येथे कार्यकर्ते यांना भेटत नाही पण शासकीय अधिकारी हे त्यांना त्यांच्या नागपूर येथील शासकीय निवासस्थानी भेटायला येत आहेत. अशी देखील माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.