पुणे दिनांक १८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक उरण येथील बोट दुर्घटना बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले की.या बोट दुर्घटना मध्ये १० प्रवासी व ३ नेव्हीचे कर्मचारी यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा येथे जात असताना उरण कारंजा येथे नैदलाच्या स्पीड बोटीने खासगी प्रवासी नीलकमल बोटला धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.यातील १०१ जणांना रेस्क्यू करण्यात आले आहे.यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.यात काही प्रवासी हे बेपत्ता झाल्याची माहिती आहे . यातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.
दरम्यान नैदलाच्या स्पीड बोटीला नवीन इंजिन बसवून त्याची ट्रायल घेत असताना ही बोट खासगी प्रवासी नीलकमल बोटला धडकून मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेतील २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान ही माहिती ७.३० वाजता घडली आहे.दरम्यान उद्या या घटनेबाबत सखोल माहिती कळेल.ही आता ७.३० वाजेपर्यंतची माहिती आहे.अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.