पुणे दिनांक १८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक आंतरराष्ट्रीय स्तरावरुन एक आरोग्य क्षेत्रा बाबत अपडेट हाती आली असून.रशिया च्या आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलाॅजी मेडिकल रिसर्च सेंटरच्या अधिका-यांनी कॅन्सरची लस तयार केल्याचा दावा केला आहे.त्यांनी म्हटले आहे की.आम्ही कॅन्सर साठी स्वतःची mRNA लस तयार केली आहे.आणि सदरची लस रुग्णांसाठी मोफत असेल.असे त्यांनी सांगितले आहे.दरम्यान या लशीची चाचणी यशस्वी झाली असून प्री- क्लिनिकल ट्रायल मध्यें या लशीमुळे ट्यूमरचा विकास पूर्णपणे थांबल्याचे पाहायला मिळाले.दरम्यान सन २०२५ पासून ही लस उपलब्ध होणार आहे.