पुणे दिनांक १८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जेष्ठ नेते व ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने ते नाराज आहेत.आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष व खासदार प्रफुल्ल पटेल हे नाशिक येथे जेष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.सदरची भेट ही नाशिक येथेच होणार असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केले हे चुकीचे आहे.दरम्यान आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छगन भुजबळ साहेबांचा मान सन्मान केला आहे.असे माध्य मांशी बोलताना तटकरे यांनी म्हटले आहे.दरम्यान आज सकाळी हाच धागा धरून स्वता नाराज झालेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे की.समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करु नये.तसेच यापुढे आंदोलनात कोणी असं कृत्य करेल तो समता परिषदेचा कार्यकर्ता नसेल.सुस्कृंतपणे आंदोलन करावे असा दम भुजबळ यांनी समता परिषदेच्या कार्यकर्त्यां ना दिला आहे.