पुणे दिनांक १८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथून एक अपडेट आली असून.आज दुपारी १२ वाजेपर्यंत महायुती सरकारचे खाते वाटप बाबत. लवकरच खातेवाटप होणार आहे.दरम्यान शिंदे मुख्यमंत्री असताना जी म्हत्वाची खाती ज्या पक्षाकडे होती ती खाती आताच्या मंत्रीमंडळात देखील त्याच पक्षांकडे राहणार आहेत.दरम्यान शिवसेना शिंदे गटा कडून विशेष करून गृहखात्याची मागणी करण्यात आली होती.पण शिवसेनेच्या मागणीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. व गृहमंत्रीपद आपल्याकडेच ठेवले आहे.तर दुसरीकडे अर्थमंत्री हे खाते अजित पवार यांनाच देण्यात येणार आहे.तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास हे खाते दिले जाणार आहे.असे म्हटले जात आहे.शिवसेना कडून संभाव्य मंत्रीपदाची यादी कालच फडणवीस यांच्याकडे देण्यात आली असून.अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसची यादी आज फडणवीस यांच्याकडे देणार आहेत.दरम्यान आज दुपारी १२ वाजता नवीन मंत्रीमंडळाचे खातेवाटप होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे .दरम्यान म्हत्वाची खाती मोठा भाऊ आपण आहोत असे म्हणून भाजपने अतिमहत्त्वाची खाती आपल्याकडेच ठेऊन तुल्यबळ अशी खाती शिवसेना एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार यांना देऊन त्यांची एकंदरीत बोळवण केली आहे.